Advertisement

किती मॅनहोल्सना जाळ्या बसवल्या - न्यायालयाची बीएमसीला विचारणा


किती मॅनहोल्सना जाळ्या बसवल्या - न्यायालयाची बीएमसीला विचारणा
SHARES

मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू होत असताना मुंबई महानगरपालिकेकडून केवळ मॅनहोल्सना संरक्षक लोखंडी जाळ्या बसवण्याचं जाहीर केलं अाहे. त्यानुसार आतापर्यंत किती मॅनहोल्सना जाळ्या बसवल्या, अशी विचारणा उच्च न्यायालयानं पालिकेला केली आहे.  

तर अद्यापही मॅनहोल्सना जाळ्या न बसवल्यानं न्यायालयानं नाराजी व्यक्त केली.  २१ जूनपर्यंत या संबंधीची माहिती देण्याचे आदेश देत न्यायालयानं पालिकेला खडसावल्याची माहिती याचिकाकर्ते रिटेल ट्रेडर्स वेल्फ विरेन शहा यांनी मुंबई लाइव्हला दिली.

२९ आॅगस्ट २०१८ रोजी एल्फिन्स्टन येथील मटकर मार्गावर डाॅ. दीपक अमरापुरकर यांचा मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूला पालिकेला जबाबदार ठरवत कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने दाखल केली आहे.


अहवाल तयार नाही

डाॅ. अमरापुरकर यांच्या मृत्यूनंतर पालिकेनं मुंबईतील सर्व मॅनहोल्सवर संरक्षण जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार किती मॅनहोल्सना जाळ्या बसवल्या याची माहिती न्यायालयानं पालिकेकडे प्रतिज्ञापत्राद्वारे मागितली होती. मात्र, बुधवारच्या सुनावणीत पालिकेनं यासंबंधीचं प्रतिज्ञापत्र सादर न करता यासंबंधीचा अहवाल तयार नसल्यानं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मागून घेतली. पालिकेच्या या कारभारावर न्यायालयानं प्रचंड नाराजी व्यक्त करत २१ जूनपर्यंत किती मॅनहोल्संना जाळ्या बसवल्या याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले.



हेही वाचा -

प्रभादेवीतील ब्यूमाँड इमारतीच्या ३३ मजल्याला मोठी आग, ९५ रहिवाशांची सुखरूप सुटका

मुंबई ते बाली समुद्रप्रवास लवकरच



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा