Advertisement

प्रभादेवीतील ब्यूमाँड इमारतीच्या ३३ मजल्याला मोठी आग, ९५ रहिवाशांची सुखरूप सुटका


प्रभादेवीतील ब्यूमाँड इमारतीच्या ३३ मजल्याला मोठी आग, ९५ रहिवाशांची सुखरूप सुटका
SHARES

प्रभादेवी इथल्या अप्पासाहेब मराठे मार्गावरील ब्यूमाँड इमारतीच्या बी विंगमधील ३३ व्या मजल्याला दुपारी २ वाजून १६ मिनिटांनी आग लागली. ही आग मोठी असून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या आणि ३ वाॅटर टँकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने ३.३० वाजेच्या सुमारास मोठ्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळवलं. 


6.33 - चार तासांनंतर अाग अाटोक्यात अाणण्यात यश 


6.11 - ब्यूमाँड इमारतीत रेल्वेमंत्री पियूष गोयल यांचंही घर अाहे.


6.08 - अाग विझवताना अग्निशमनचे  हरिश्चंद्र रावराणे (५४) अाणि शिवाजी अाचरेकर (५३) हे कर्मचारी जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर अाहे. 


5.49 - अग्निशमन दलाचेे अाणखी पाच बंब दाखल


 

5.34 -  ३२, ३३ या मजल्यांवरील ज्या फ्लॅटला अाग लागली तो फ्लॅट हरीष फाबिया यांच्या नावे अाहे. या ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये फर्निचरचं काम सुरू होतं. या कामादरम्यान अाग लागली. हरिष सध्या यूएसमध्ये अाहेत. 

5.09 - इमारत परिसरात वाहतूक सुरळीत 

5.08 - दिपीकाने मानले चाहत्यांचे अाभार 

 

5.07 -  अाग नियंत्रणात 4.52 - वाऱ्यामुळं अाग खालच्या मजल्यावर पसरण्यास सुरूवात


4.30 - मुंबई अग्निशमन दलाकडे केवळ १७ ते १८ मजल्यांच्या इमारतींना लागलेली अाग विझवण्याची यंत्रणा अाहे. असं असताना ३० ते ३५ मजल्यांच्या इमारतींना परवानगी का देण्यात येते, असं म्हणत शिवसेना अामदार सदा सरवरणकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.  

4.15 -  स्थानिक नगरसेविका किशोरी पेडणेकर घटनास्थळी  


4.10 -

4.08 - 

4.05 -


4.04 आग पुन्हा भडकली 

3.40 इमारतीच्या ३२ आणि ३३ व्या मजल्याचा मालक अमेरिकेत

3.37 अग्निशमन दलाचं इमारतीत कूलिंग आॅपरेशन सुरू

3.33 आग ३२ व्या मजल्यावरून ३३ व्या मजल्यापर्यंत पोहोचली होती आग

3.32 आग २ वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती

3.31 आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश

3.30 गॅसची लाइनही बंद करण्यात आली

3.29 परिसरातील वीजपुरवठा खंडीत करण्यात आला

3.23 अग्निशमन दलाची इमारत परिसर सील करण्याची तयारी

3.20  इमारतीखाली गर्दी करणाऱ्या बघ्यांवर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज  


 
3.18  इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश

3.14  आगीत २६ व्या मजल्यावरील दिपिकाच्या घराला कुठलीही हानी पोहोचली नसल्याची माहिती पुढं येत आहे.  

3.00  ही आग तिसऱ्या लेव्हलची असल्याचं अग्निशमन दलाने केलं स्पष्ट. 

2.50 एसीत शाॅर्टसर्किट होऊन स्फोट झाला. त्यानंतर ३३ व्या मजल्यावर आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 2.45 या आगीत ३३, ३४ आणि ३५ असे तीन मजले पूर्णपणे जळाल्याची माहिती पुढं येत आहे. या इमारतीमध्ये अनेक सेलिब्रिटींची घरं असल्याचंही म्हटलं जात आहे. 


 

2.40 अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 

2.35  इमारतीतील ९५ रहिवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आलं आहे. या आगीत अद्याप कुणीही जखमी झाल्याची माहिती मिळालेली नाही.


इथं, बघा आगीचे अपडेट्स
आग विझवणं कठीण

मुंबईत आग लागण्याच्या घटना सुरूच असून बुधवारी दुपारी ब्यूमाँड या बहुमजली इमारतीला आग लागली. मुंबईत गेल्या काही वर्षांत बहुमजली इमारतींची संख्या वाढली असून मोठ्या इमारतीला लागलेली आग विझवणं अग्निशमन दलाला अवघड जात आहे. असं असताना ब्यूमाँड इमारतीच्या ३३ व्या मजल्याला आग लागल्यानं अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत असल्याचं चित्र दिसत आहे. ही आग नेमकी कशी लागली हे अद्याप कळलेलं नसून यात अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.रहिवाशांना धुराचा त्रास

पण आग बरीच मोठी असल्यानं दूर दूरपर्यंत धुराचे लोळ पसरले आहेत. तर आग लागलेला संपूर्ण परिसर रहिवासी आणि व्यावसायिक असा असल्यानं धुराच्या लोळांचा मोठा त्रास येथील रहिवाशांना होत आहे. दरम्यान याच इमारतीत अभिनेत्री दिपिका पादुकोण रहात असल्याचीही माहिती समोर येत आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा