Advertisement

राज्यातील १४ लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात, रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर

गेल्या २४ तासांमध्ये ८१४२ नवे रुग्ण सापडले. तर १८० रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर २.६४ एवढा झाला आहे.

राज्यातील १४ लाखांहून अधिक रुग्णांनी केली कोरोनावर मात, रिकव्हरी रेट ८७ टक्क्यांवर
SHARES

राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरणीला लागला असून त्यात सलग काही दिवस घट आहे. बुधवारी दिवसभरात उच्चांकी २३, ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही १४,१५,६७९ एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा ८७.५१ टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांमध्ये ८१४२ नवे रुग्ण सापडले. तर १८० रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर २.६४ एवढा झाला आहे.

एकूण घेतलेल्या ८३,२७,४९३ चाचण्यांपैकी १६,१७,६५८ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. म्हणजे हे प्रमाण १९.४३ टक्के एवढं आहे.. दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे समाजावर आरोग्यविषयक परिणामांव्यतिरिक्त इतरही अनेक परिणाम होत आहेत. जगभर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली असून त्याचे चटके सर्वच थरांतील लोकांना बसत आहेत. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून, त्याचा फटका करिअरच्या मध्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा जेष्ठ कर्मचाऱ्यांना अधिक बसत आहे.

हेही वाचाः- कंगनाची सोमवारी होणार चौकशी,  मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली नोटीस

अमेरिकेतील द न्यू स्कूल विद्यापीठाच्या सर्वेक्षणात असं समोर लक्षात आलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच मध्यमवयीन नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नोकरदारांना बेरोजगारीचा अधिक प्रमाणात सामना करावा लागत आहे, असं मंगळवारी द न्यू स्कूलने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा