Advertisement

कंगनाची सोमवारी होणार चौकशी, मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली नोटीस

कंगना तिची बहीण रंगोलीविरोधात १७ ऑक्टोबर रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस तिची सोमवारी चौकशी करणार आहेत.

कंगनाची सोमवारी होणार चौकशी,  मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली नोटीस
SHARES

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. कंगना तिची बहीण रंगोलीविरोधात १७ ऑक्टोबर रोजी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिस तिची सोमवारी चौकशी करणार आहेत. यासाठी सध्या हिमाचलमध्ये असलेल्या कंगनाला मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअॅपद्वारे नोटीस पाठवली आहे.

मुन्ना वराली आणि साहिल अशरफ सैय्यद यांनी वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कंगना आणि रंगोली विरुद्ध गुन्हा दाखल करा, असे आदेश वांद्रे न्यायालयाने दिले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगनाला चौकशीसाठी बोलावलं आहे. ती सध्या हिमाचलमध्ये तिच्या घरी आहे. 

साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात १५२३ ए, २९५ ए, आयपीसी १२४ ए या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



हेही वाचा -

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानं



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा