Advertisement

मुंबईतील 'ओल्ड मॅन' गायब?


मुंबईतील 'ओल्ड मॅन' गायब?
SHARES

नाताळचा सण जवळ यायला लागला की सगळ्याच लहान मुलांना सांताक्लॉजकडून मिळणाऱ्या भेटवस्तूंची आठवण येते. सांताक्लॉज काय भेटवस्तू देणार याची सगळ्यांनाच आतुरता असते. याच गंमती-जमती सोबत बच्चेकंपनीला एक वेगळच वेड असतं ते म्हणजे 'सांताक्लॉजचा पुतळा' बनविण्याचं. मात्र, ही मौज-मजा आता मुंबईतून नाहीशी झाली आहे.

डिसेंबर महिना सुरू झाला की बच्चेकंपनी सांताक्लॉजचा पुतळा बनविण्याची तयारी करतात. जूने कपडे, गवत, टोपी व मास्क या वस्तूंचा वापर करून आकर्षक असा पुतळा तयार करतात. या पुतळ्याला रस्त्याच्या कडेला ठेवून 'ओल्ड मॅनसाठी मदत करा' असं म्हणत बच्चे कंपनी पैसे गोळा करतात. जमा झालेले पैसे एकत्र करून त्या पैशात पार्टी करतात. सांताक्लॉजचा पुतळा बनवायचा आणि त्याला जाळायचा हा क्षण बच्चेकंपनी खूप एन्जॉय करतात.

मागील अनेक वर्ष सांताक्लॉजचा पुतळा बनविण्याची ही प्रथा नाहीशी झाली आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईतल्या गल्लोगल्ली अशाप्रकारे पुतळे तयार केले जायचे. मात्र, या पुतळ्याची मजा आता कुठेच पाहायला मिळत नाही. यामागचं कारण कधाचित 'मोबाईलचं वेड' असू शकतं. कारण, प्रत्येक लहान मुलाच्या हाती मोबाईल पाहायला मिळत आहे. त्यामुळं या मोबाईलच्या वेडापाई बच्चेकंपनीची ही मौज-मजा मुबईतून कायमची नाहीशी होण्याची चित्र आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा