Advertisement

मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात होणार हेलिपॅड


मुंबईसह प्रत्येक जिल्ह्यात होणार हेलिपॅड
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री एक-दोनदा नव्हे तर तब्बल चार वेळा हेलिकाॅप्टर अपघातातून बचावले अाहेत. त्यामुळेच की काय मुख्यमंत्र्यांनी बहुदा हेलिकाॅप्टर प्रवासाचा धसका घेतला अाहे. अाता शासनानं अाता सर्वच जिल्ह्यात हेलिपॅड बनविण्यासाठी धोरण तयार केलं अाहे. केंद्रीय नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांवर अाधारित हे धोरण असेल.


सर्व जिल्ह्यात कायमस्वरूपी हेलिपॅड

सरकारच्या या धोरणानुसार सर्व जिल्ह्यात कायमस्वरूपी हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करून अहवाल शासनाला सादर करण्याचे अादेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


मोकळ्या जागेवर हेलिपॅड

हेलिपॅड बनवण्यासाठी सध्या कोणतेही धोरण अस्तित्वात नव्हतं. जिथे मोकळा भूखंड असेल तिथे तात्पुरत्या स्वरूपात हेलिपॅड उभारण्यात येते. मात्र यापुढे हेलिपॅड बनवण्यासाठी धोरण तयार करण्यात येईल आणि सध्या असलेल्या सर्व हेलिपॅडचे ऑडिट करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली होती.


५०० मीटर परिघात अडथळे नसावेत

हेलिकॉप्टर उतरण्याच्या जागेवर २४५ मीटर आणि हेलिपॅडपासून ५०० मीटर परिघात कोणताही अडथळा नसावा. त्याप्रमाणे हे नवीन हेलिपॅड धोरण असणार आहे. हेलिपॅडच्या परिसरात वीज वाहिन्या, डाटा-टेलिफोन केबल, ट्रान्सफॉर्मर, मोबाईल टॉवर असे उड्डाणात अडथळा अाणणारे कोणतेही घटक नसावेत. मानवी वस्त्यांपासून हेलिपॅडची जागा दूर असावी असं धोरणात नमूद करण्यात आलंय.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा