Advertisement

मुंबईतल्या 'या' भागात सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंद

२४ महापालिका वॉर्डमधून, अंधेरी पश्चिम, जुहू आणि वर्सोवा भागात समाविष्ट असलेल्या के/पश्चिम वॉर्डांमध्ये सध्या जवळपास १३० सक्रिय प्रकरणे आहेत.

मुंबईतल्या 'या' भागात सर्वाधिक कोविड रुग्णांची नोंद
(Representational Image)
SHARES

गुरुवार, २४ फेब्रुवारी रोजी मुंबईत २०० पेक्षा कमी कोविड-19 प्रकरणं नोंदवली गेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) रुग्णांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. शहरात ११९ नवीन कोरोनाव्हायरस संसर्गाची नोंद झाली आहे. तर एकूण संख्या १०,५५,१६१ आहे.

खात्यांच्या आधारे, पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला उच्चभ्रू वस्तीत राहणारे कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे, काही इतर वॉर्ड्समध्ये जास्त सक्रिय प्रकरणे आहेत. त्यामध्ये अनुक्रमे वांद्रे पश्चिम (एच/पश्चिम वॉर्ड) आणि कुर्ला (एल वॉर्डचा ) समावेश आहे. या वॉर्ड्समध्ये ९३ आणि ८४ प्रकरणे आहेत.

विमानतळ आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या जवळ असल्यानं के/पश्चिम वॉर्डमध्ये रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं सुरेश काकाणी यांनी सांगितलं.

काकाणी यांनी पुढे टिपणी केली की, शहरातील एकूणच कल कमी आहे आणि रूग्णालयात दाखल होण्याची गरज असलेल्या लोकांची संख्या देखील किरकोळ आहे आणि रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे. त्यांनी सांगितलं की, पुढील आठवड्यात सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी होईल अशी त्यांना आशा आहे.



हेही वाचा

पालिकेनं मुंबईतील लसीकरण केंद्रे कमी करण्याचा निर्णय का घेतला?

लससक्ती रद्द होणार?, २५ फेब्रुवारीला होणार निर्णय

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा