आरटीईची तिसरी सोडत जाहीर

 Mumbai
आरटीईची तिसरी सोडत जाहीर
आरटीईची तिसरी सोडत जाहीर
See all

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील सोडत शिक्षण विभागाकडून पार पाडण्यात आली. तिसऱ्या यादीनुसार एकूण 2 हजार 440 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत.

याआधी आरटीई अंतर्गत पहिली ऑनलाईन सोडत 7,449 जागांसाठी काढण्यात आली होती. यामध्ये एकूण 1,996 मुलांना प्रवेश मिळाला. उर्वरीत जागांसाठी 24 मार्च, 2017 रोजी दुसरी सोडत काढण्यात आली आहे. पहिलीच्या वर्गासाठीच्या 679 जागा तर पूर्व प्राथमिकसाठी 633 अशा एकूण 1312 जागा भरण्यात आल्या आहेत. तर इतर बोर्डाच्या पहिलीच्या वर्गासाठी 277 तर पूर्व प्राथमिकसाठी 72 अशा 349 जागा भरल्या गेल्या आहेत.

आरटीईची तिसरी सोडत हे चित्र समाधानकारक नाही, असं मत अनुदानित शिक्षा बचावाचे सल्लागार सुधीर परांजपे यांनी व्यक्त केले आहे. तिसऱ्या सोडतीत खूप कमी जागा भरल्या गेल्या आहेत. 1 तृतीयांश जागासुद्धा भरल्या गेल्या नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासाठी त्रास देत आहेत. मालवणीच्या एका शाळेत जातीचा दाखला देऊनही शाळा प्रवेशासाठी चालढकल केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांना काही ना काही कारणांनी गाळले जाणार असून, जागा कमी असल्याने काही विद्यार्थी आरटीईच्या लाभापासून वंचित राहणार आहेत असे परांजपे म्हणाले.

Loading Comments