SHARE

मुंबईसह राज्यात स्वाईन फ्लूने पुन्हा डोकं वर काढलं असून मुंबईत स्वाईन फ्लूने तिसरा बळी घेतला आहे. भांडुपमधील टिळक नगर परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय गर्भवती महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर यांनी दिली आहे.

ही महिला गेल्याच महिन्यात अलाहाबादवरून मुंबईत आली होती. उलट्या, तापाच्या त्रासासोबतच तिच्या छातीतही दुखत होतं. तसेच तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे तिला भांडुपमधील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिची प्रकृती खालावल्यामुळे तिला शीव रुग्णालयात हलवण्यात आलं. तेथे तिला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर तिला टॅमी फ्लू औषध देऊन तिच्यावर उपचारही सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 16 मे राजी तिचा मृत्यू झाला.

यापूर्वी 2 मे रोजी वरळीतील आंबेडकर नगरमधील एका दीड वर्षांच्या मुलाचा, तर 12 मे रोजी कुर्ल्यातील एका वृद्ध महिलेचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला होता. या दोन घटनांनंतर महापालिकेने कुर्ला आणि वरळी परिसरातील हजारो नागरिकांची आरोग्य तपासणी केली होती. तसेच टॅमी फ्लूच्या गोळ्याही वाटल्या होत्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या