जादूगार पोलीस

Mumbai  -  

मुंबई - खाकी वर्दीतला जादूगार. ऐकायला कसं वाटतं. थोडं आश्चर्य वाटलं असेल ना. खाकी वर्दीतला पोलीस म्हटलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. मात्र आम्ही तुम्हाला खाकी वर्दीतला जादूगार दाखवणार आहोत. तुम्ही विचारात पडाला असाल ना.

हे आहेत पोलीस निरीक्षक सुभाष दगडखैर. मात्र आता त्यांची ओळख फक्त पोलीस एवढीच राहिली नाही तर एक जादूगार म्हणून देखील झालीय. तब्बल 3 हजार जादूच्या खेळात ते पारंगत आहेत. 1982 साली दगडखैर पोलीस खात्यात भरती झाले. 1985 साली त्यांना अस्थमाचा त्रास सुरु झाला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना कोणत्याही खेळात मन गुंतवण्याचा सल्ला दिला आणि तेव्हा सुरु झाली त्यांची जादूची तपस्या जी आजही सुरू आहे. दगडखैर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. जादूच्या जगतातील ऑस्कर म्हणवल्या जाणारा मर्लिन पुरस्कार, राष्ट्रपती पुरस्कार तसंच लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील त्यांच्या नावाची नोंद आहे. पोलीस म्हणून कार्यरत असलेले सुभाष दगडखैर यांना त्यांच्या कलेच्या वेडापायी सेलिब्रेटीचाही दर्जा मिळालाय. याच जादूचा वापर करुन त्यांनी चोरांनी देखील पकडलंय. जादूच्या या कलेला निवृत्तीनंतर पूर्णपणे वाहून घेण्याचा सुभाष दगडखैर यांचा मानस आहे. दगडखैरांच्या या वाटचालीला ‘मुंबई लाइव्ह’च्या शुभेच्छा.

Loading Comments