Advertisement

५०० रुपये मिळवायचेत? मग पाहा महापालिकेच्या अॅपवर खड्ड्यांबाबत कशी करायची तक्रार

महापालिकेच्या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर MYBMC Pothole Fixit हे अॅप गरजेचं आहे. त्यामुळे हे अॅप कसं काम करतं? अॅपच्या मदतीनं कशी तक्रार करायची यासाठी हा व्हिडिओ पाहा

SHARES

'खड्डे दाखवा पैसे मिळवा' ही नवी योजना मुंबई महापालिका घेऊन आली आहे. खड्डा दाखवला तर मुंबईकरांना ५०० रुपये मिळणार आहेत. १ नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपासून खड्डा दाखवलात तर ५०० रुपये तुम्हाला मिळू शकतात. 

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्त प्रविण परदेशींनी ही नवी योजना आणली आहे. पण हे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी महापालिकेनं काही अटी घातल्या आहेत. त्यांची पहिली अट आहे ती म्हणजे MYBMC Pothole Fixit हे अॅप डाऊनलोड करणं. कारण या अॅपवरूनच तुम्ही तक्रार नोंदवू शकता. ('खड्डे दाखवा, पैसे मिळवा' या योजनेच्या सगळ्या अटी वाचण्यासाठी क्लिक करा)

MYBMC Pothole Fixit हे अॅप तुम्ही कसे डाऊनलोड कराल आणि डाऊवलोड केल्यानंतर या अॅपच्या मदतीनं कशी तक्रार नोंदवायची? हे अॅप कसं काम करतं याची सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या व्हिडिओद्वारे मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहा आणि अॅपवर तक्रार करून ५०० रुपये कमवा.



हेही वाचा

'खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’, महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा