Advertisement

'खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’, महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्त प्रविण परदेशींनी ही नवी योजना आणली आहे. पण हे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी महापालिकेनं काही अटी घातल्या आहेत.

'खड्डे दाखवा, ५०० रुपये मिळवा’, महापालिकेचं मुंबईकरांना चॅलेंज
SHARES

मुंबई महापालिका 'खड्डे दाखवा, पैसे मिळवा' ही नवी योजना घेऊन आली आहे. खड्डा दाखवला तर मुंबईकरांना ५०० रुपये मिळणार आहेत. १ नोव्हेंबर म्हणजे शुक्रवारपासून खड्डा दाखवलात तर ५०० रुपये तुम्हाला मिळू शकतात. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आयुक्त प्रविण परदेशींनी ही नवी योजना आणली आहे. पण हे तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी महापालिकेनं काही अटी घातल्या आहेत

'या' आहेत महापालिकेच्या अटी

) खड्डे दाखवा, पैसे मिळवा या योजनेसाठी MYBMC Pothole Fixit हे अॅप डाऊनलोड करून त्यावर तक्रार नोंदवावी लागेल. (MYBMC Pothole Fixit हे अॅप कसं वापराल हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.)

) मुंबईकरांनी दाखवलेला खड्डा कमीत कमी १ फुट लांब आणि ३ इंच खोल असावा

) तक्रारीनंतर २४ तासांत खड्डा भरला गेला तर पैसे मिळणार नाहीत.


मुंबई खड्डेमुक्त होईल?

काही महिन्यांपूर्वी पालिकेनं शहरातील रस्त्यांवर अवघे ४१४ खड्डे आहेत असा दावा केला होता. मात्र हा दावा चुकिचा असल्याची तक्रार अनेकांनी केली होती. आता या योजने अंतर्गत किती खड्डे भरले जातात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. 

मुंबईला खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेनं यापूर्वीही अॅपवर तक्रार नोंदवा असे आवाहन नागरिकांना केले होते. याचाच परिणाम असा की महापालिकेच्या MCGM 24*7 अॅपवर अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आल्याचा दावा पालिकेनं केला होता. पण अनेक रस्त्यांवर खड्डे अजूनही कायम आहेत.  



हेही वाचा

५०० रुपये मिळवायचेत? मग पाहा महापालिकेच्या अॅपवर खड्ड्यांबाबत कशी करायची तक्रार


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा