Advertisement

ठाणे महानगरपालिकेची डोर टू डोर लसीकरण मोहीम ठरतेय वरदान

ठाणे महानगरपालिकेची घरोघरी लसीकरण मोहीम शहरातील अनेक भागातील वृद्धांसाठी आणि मजुरांसाठी वरदान ठरली आहे.

ठाणे महानगरपालिकेची डोर टू डोर लसीकरण मोहीम ठरतेय वरदान
SHARES

ठाणे महानगरपालिकेची घरोघरी लसीकरण मोहीम शहरातील अनेक भागातील वृद्धांसाठी आणि मजुरांसाठी वरदान ठरली आहे. शहरातील विविध जंक्शनवर कामाच्या शोधात बसलेल्या मजुरांना आणि झोपडपट्ट्यांमध्ये किंवा शहराच्या दुर्गम भागात राहणाऱ्या मजुरांचे लसीकरण करण्यासाठी टीएमसीनं अनेक उपक्रम सुरू केले आहे.

टीएमसीचे लसीकरण अधिकारी डॉ प्रसाद पाटील म्हणाले, "आमच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, आम्ही खाजगी कार्यालयातील जागा, निवासी सोसायट्या, बांधकाम स्थळे, झोपडपट्टी भागात पोहोचतो आणि विशेष लसीकरण मोहीम राबवतो.

"तथापि, डॉक्टरांनी असं सुचवलं आहे की, लसीकरणाचा पूर्ण पहिला डोस प्राप्त करण्यासाठी अशा उपक्रमांची सुरुवात अगोदरच करायला हवी होती. TMC वैद्यकीय अधिकारी म्हणाले, "अशा अनिच्छेनं किंवा संकोच करणाऱ्या लोकसंख्येला अकराव्या तासात लसीकरण करणे पुरेसे नाही."

पाचपाखाडीतील नामदेववाडी इथल्या रहिवासी ६९ वर्षीय भगवान खेरतकर यांना या आठवड्यातच लसीकरणाचा पहिला डोस मिळाला. अपघातात त्याच्या उजव्या हाताचा आणि डाव्या पायाचा काही भाग गमावल्यामुळे आधाराशिवाय लसीकरण करणं हे मोठं काम होतं. घरोघरी लसीकरणाबाबत त्यांच्या कुटुंबालाही माहिती नव्हती आणि त्यामुळे त्यांची पत्नी आणि दोन मुलींना पूर्णपणे लसीकरण करूनही खेरतकर यांना त्यांचा पहिला डोस मिळू शकला नव्हता.

त्यांच्या घराजवळ उभारण्यात आलेल्या लसीकरण शिबिरानंतरच खेरटकर कुटुंबीयांनी लसीकरण सुविधेचा लाभ घेतला.

“टीएमसीचे लोक अजूनही लसीकरण न केलेले कोणी आहेत का याची चौकशी करण्यासाठी आले होते. त्यांनी सांगितलं की, नर्स येऊन लसीकरण करतील. त्यांनी माझी Cowin अॅपवर नोंदणी देखील केली आणि संध्याकाळपर्यंत माझ्याकडे पहिल्या डोसचे प्रमाणपत्र होते. माझ्या प्रकृतीमुळे मी बर्‍याच औषधांच्या अधीन आहे म्हणून माझे कुटुंब माझ्यावर लसीकरणाच्या परिणामांबद्दल साशंक होते. शिवाय, मी कुठेही बाहेर जात नाही. त्यामुळे मला लसीकरणास उशीर करणे योग्य वाटले,” असं खेरतकर म्हणाले.



हेही वाचा

कोविड लसीच्या तिसऱ्या डोससंदर्भात लवकरच निर्णय

पालक COVID-19 लसींसाठी नोंदणी करू शकतात, मात्र...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा