Advertisement

पालक COVID-19 लसींसाठी नोंदणी करू शकतात, मात्र...

महाराष्ट्र सरकारनं असंही नमूद केलं आहे की, ते लवकरच इयत्ता १ ते ४ थीचे शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत.

पालक COVID-19 लसींसाठी नोंदणी करू शकतात, मात्र...
SHARES

मुंबईत या वर्षी सप्टेंबरपासून मुलांमध्ये कोविड-१९ प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. मात्र मुलांसाठी लसीकरण सुरू व्हायचे आहे.

आता, मुंबईतील SRCC चिल्ड्रन हॉस्पिटलनं २-१७ वयोगटातील मुलांच्या पालकांना त्यांच्या मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन केल्याचं समोर आलं आहे. मात्र, सरकारी परवानगीनंतरच लसीकरण मोहिमेच्या तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

शहर आणि राज्यात इयत्ता ५ वी ते १२वी पर्यंत शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. याशिवाय, महाराष्ट्र सरकारनं असंही नमूद केलं आहे की, ते लवकरच इयत्ता १ ते ४ थीचे शारीरिक वर्ग पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहेत.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेल्या महिन्यात सांगितलं होतं की, शहर ३३ लाख बालकांना लसीकरण करण्यास तयार आहे आणि मार्गदर्शक तत्त्वांची वाट पाहत आहे.

भारत बायोटेकनं सप्टेंबरमध्ये १८ वर्षांखालील मुलांवर कोविड-19 लसीच्या कोवॅक्सिनच्या फेज २/३ चाचण्या पूर्ण केल्या आहेत. लहान मुलांसाठी लस ऑक्टोबरमध्ये सुरू होईल, असं यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. तथापि, नंतर असं सांगण्यात आलं की देशभरातील बालकांना लसीकरण करण्यास अजून वेळ लागू शकतो.

ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, नऊ वर्षांखालील १३,९४७ मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये जवळपास ४९,७४३ जणांना कोरोनाचे संक्रमण झाले. तर १०वी ते १९ वर्षे वयोगटातील ३५,८०६ जणांमध्ये संसर्ग झाल्याचे दिसून आले.


हेही वाचा

लसीकरणाचा वेग वाढवणार, सेलिब्रिटिंची मदत घेणार - राजेश टोपे

३० नोव्हेंबपर्यंत राज्यात संपूर्ण लसीकरण ; आरोग्य मंत्री राजेश टोपे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा