Advertisement

लसीकरणाचा वेग वाढवणार, सेलिब्रिटिंची मदत घेणार - राजेश टोपे


लसीकरणाचा वेग वाढवणार, सेलिब्रिटिंची मदत घेणार - राजेश टोपे
SHARES

सोमवारी, १७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, अधिकाधिक नागरिकांना लसीकरणाची खात्री करण्यासाठी, ते कोविड-19 लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. यासाठी ते सेलिब्रिटींशी संपर्क साधतील, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.

जनजागृती उपक्रमासाठी बॉलीवूड अभिनेता सलमान खान सारख्या ख्यातनाम व्यक्तींना आणण्यासाठी चर्चा सुरू आहे.

एएनआयनं ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अधिकाधिक लोकांचं लसीकरण व्हावं, यासाठी आम्ही धार्मिक नेते, प्रसिद्ध व्यक्तींना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहोत. जनजागृती मोहिमेसाठी सलमान खानसारख्या सेलिब्रेटींना ऑनबोर्ड आणण्यासाठी आम्ही चर्चा करत आहोत – राजेश टोपे

अहवालांच्या आधारे, टोपे यांनी स्पष्ट केलं की लसीच्या डोसच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असला तरी काही भागात वेग कमी आहे.

टोपे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आतापर्यंत १०.२५ कोटींहून अधिक कोविड-19 डोसचे व्यवस्थापन करण्यात आले आहे. पुढे, त्यांनी नमूद केलं की सर्व पात्रांनी नोव्हेंबरच्या अखेरीस किमान त्यांचा पहिला शॉट घेतला असेल.

दुसरीकडे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही लसीकरण मोहिमेदरम्यान एका विशिष्ट समुदायामध्ये धार्मिक आशंका कशाप्रकारे निर्माण झाल्या हे विशद केले. यामुळे तिच्या मते थोडा विलंब झाला. खान सारख्या अभिनेत्यांनी समाजाला लसीकरणासाठी प्रोत्साहित केलं पाहिजं असं पेडणेकरांचं मत आहे आणि ते लवकरच लसीकरण करतील अशी आशा आहे.



हेही वाचा

१०० टक्के मुंबईकरांनी घेतला लसीचा पहिला डोस

कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करा - राजेश टोपे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा