कहीं का है सिग्नल, कहीं पे है जाना!

 Marine Drive
कहीं का है सिग्नल, कहीं पे है जाना!

सँडहर्स्ट - येथील मोहम्मद अली रोडवरील एक सिग्नल सध्या चर्चेचा विषय बनत आहे. या बिघडलेल्या सिग्नलमुळे वाहन चालवताना चालकांना त्रास होत आहे. हा सिग्नल चुकीच्या दिशा दाखवत असल्याने वाहनचालक पुरते वैतागले आहेत. भायखळा ते सीएसटी प्रवासा दरम्यान नेहमी या सिग्नलचा त्रास होत असल्याची प्रतिक्रिया राहुल माने या प्रवाशाने दिली. हा बिघडलेला सिग्नल लवकरात लवकर दुरुस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. त्यामुळे प्रशासन याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न येथील स्थानिकांना पडलाय.

Loading Comments