Advertisement

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची अचानक बदली

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची अचानक बदली करण्यात आली आहे. लोकेश चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे.

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची अचानक बदली
SHARES

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांची अचानक बदली करण्यात आली आहे. लोकेश चंद्र यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची बदली करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी हे आता सिडकोचे नवे व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत. 


तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना मंत्रालयात पदोन्नती देण्यात आल्यावर त्यांच्या जागी लोकेश चंद्र यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकेश चंद्र यांच्या काळातच सिडकोने १५ हजार घरांच्या महागृहप्रकल्पाचा शुभारंभ केला. तसेच, लोकेश चंद्र यांच्या कारकिर्दीत तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक लाख घरे बांधण्याची घोषणाही केली होती. सिडकोचा कारभार लोकेश चंद्र यांच्यावर असताना काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर कोकण विभागिय आयुक्त पदाचा अतिरीक्त कारभार सोपवण्यात आला होता. परंतू हे कामकाज सुरुळीत असतानाच अचानक लोकेश चंद्र यांची बदली करण्यात आली आहे. 

सिडको नवे एमडी डॉ. संजय मुखर्जी हे १९९६ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी आहेत. याआधी वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य विभागाचे ते सचिव होते. मुखर्जी यांनी मुंबई महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त म्हणून ४ वर्षे काम केले आहे. त्यांच्या काळात त्यांनी भूमिगत जलवाहिन्या, सागरी किनारा मार्ग आणि मलःनिस्सारण प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले.



हेही वाचा -

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंविरोधात पुरावे द्या, राऊतांचं भाजपला आव्हान

मग, संजय राऊत बोलत असल्यानेच संशय वाढलाय- नारायण राणे




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा