Advertisement

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळच्या 4 हजार 700 विशेष गाड्या

आषाढी एकादशीनिमित्त हा निर्णय घेण्यात येणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त एसटी महामंडळच्या 4 हजार 700 विशेष गाड्या
SHARES

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाच्या (ST Corporation) सुमारे 4 हजार 700 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (Adv. Anil Parab) यांनी केली.

परब म्हणाले, दिनांक 6 जुलै ते 14 जुलै, 2022 दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी दि. 8 जुलै रोजी 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

यात्रेसाठी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती येथून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही परब यांनी केले.

औरंगाबाद -1200, मुंबई -500, नागपूर- 100, पुणे -1200, नाशिक-1000 तर अमरावती येथून 700 अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पूर्ती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहे.

असे असेल नियोजन

  • चंद्रभागा बसस्थानक – मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग आणि पंढरपूर आगार
  • भिमा यात्रा देगाव – औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती प्रदेश
  • विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर
  • पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्गहेही वाचा

मुंबईतल्या 'या' स्थानकावर १५ दिवस लोकल ट्रेन थांबणार नाही

मुंबई मेट्रो लाइन 2A, 7 चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा