Advertisement

कियारा अडवाणी, कार्तिक आर्यनचे एकच ट्विट, मुंबईतील बेपत्ता कुटुंब सापडले

दादर इथले एक जोडपे देखील फिरण्यासाठी उत्तर भारतात गेले होते. ते हिमाचल इथल्या पुरात अडकले आहे.

कियारा अडवाणी, कार्तिक आर्यनचे एकच ट्विट, मुंबईतील बेपत्ता कुटुंब सापडले
SHARES

हिमाचल भागात पूर आल्यामुळे अनेक पर्यंटक अडकल्याची माहिती समोर येतेय. यामध्ये मुंबईतील पर्यटकांचाही समावेश आहे. दादर इथले एक जोडपे देखील फिरण्यासाठी उत्तर भारतात गेले होते. पण पावासमुळे आणि तिथे आलेल्या पुरामुळे ते तिकडेच अडकले. पण अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्या ट्विटमुळे बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांना त्यांचा थांगपत्ता लागण्यास मदत मिळाली. 

दादर इथे राहणारे धीरेन, सुनीता, शुभम आणि किरणा वीरा २९ जून रोजी लेह लडाखला रोड ट्रिपला गेले होते आणि सोमवारी सकाळी परतणार होते. शुभमचा चुलत भाऊ दिपिनने हिदुस्तान टाईम्सला म्हटले की, “त्यांनी शनिवारी आम्हाला कॉल केला की ते मनालीला जाणाऱ्या अटल बोगद्याच्या चार किलोमीटर आधी भूस्खलनामुळे अडकले होते. रविवारी, त्यांनी आम्हाला सांगण्यासाठी व्हिडिओ कॉल केला की ते सुरक्षित आहेत आणि कारमध्ये रात्र घालवली आहे. आम्ही त्यांना कार अनलॉक ठेवण्याचा आणि हिटर चालू न करण्याचा सल्ला दिला. पण त्या कॉलनंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकलो नाही.”

चिंतेत असलेल्या दिपिन आणि त्याच्या चुलत भावांनी मंगळवारी एक मेसेज सोशल मीडियावर शेअर केला. हा संदेश फेसबुक, विविध व्हॉट्सअॅप ग्रुप, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झाला. ट्विटरवर, बॉलिवूड सेलिब्रिटी कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनीही ट्विट शेअर केले. 

काही तासांतच, एका स्थानिकाकडून प्रतिसाद आला, की कुटुंब सुरक्षित आहे आणि मनालीजवळील सिसू येथील लष्करी छावणीत आश्रय घेत आहे.

“आम्हाला सिद्धार्थ नावाच्या व्यक्तीचा फोन आला, ज्याने ट्विट वाचल्यानंतर स्थानिक पोलिसांशी बोलल्याचे सांगितले,” कुटुंबाचे नातेवाईक दीपिन शाह म्हणाले. "त्याने पुष्टी केली की कुटुंब खरोखरच लष्करी छावणीत होते."

“आमच्या सर्व प्रयत्नांनंतरही, आम्ही अद्याप त्यांच्याशी थेट संपर्क स्थापित करू शकलो नाही,” दिपिन म्हणाला.

ते पुढे म्हणाले “पण आम्हाला किमान माहित आहे की ते बेपत्ता नाहीत. कियारा आणि कार्तिक दयाळू आणि तत्पर होते ज्यामुळे आमचा मेसेज सोशल माडियावर व्हायरल झाला. त्यांच्या ट्विटमुळेच आम्हाला मदत झाली.”

कांदिवलीतील आणखी एक कुटुंब देखील स्पिती व्हॅलीच्या सहलीला गेलेल्या आणि रविवारी परतणार असलेल्या वत्सल आणि प्रियल शाह यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. ते मनालीमध्ये अडकले असले तरी सुरक्षित असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

“ते मनालीत आहेत,” वत्सल आणि प्रियलचे काका पराग शाह म्हणाले.

 “सोमवारी सकाळी, त्यांनी फोन केला आणि सांगितले की ते सुरक्षित आहोत पण वेगळ्या हॉटेलमध्ये आम्हाला हलवत आहेत. मात्र, त्या फोननंतर कोणताही संपर्क झालेला नाही. आम्ही काळजीत आहोत कारण 36 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. आम्ही हॉटेल क्रमांक आणि इतर संभाव्य स्थानिक संपर्क देखील वापरत आहोत.”

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये अतिवृष्टी झाली, ज्यामुळे भूस्खलन, पूर आणि मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.



हेही वाचा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा