Advertisement

मार्वे : समुद्रात बोट बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह सापडले

३ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी २ लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर १ अद्याप बेपत्ता आहे.

मार्वे : समुद्रात बोट बुडाल्यानंतर बेपत्ता झालेल्या दोघांचे मृतदेह सापडले
SHARES

बुधवारी, मालाडच्या मार्वे समुद्रात एक बोट बुडाली होती. या अपघातात ४ जणांचा जीव वाचला होता. तर ३ जण बेपत्ता होते. गुरुवारी पोलिसांनी माहिती दिली की, बेपत्ता झालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र एक जण अजूनही बेपत्ता आहे. 

बुधवारी पाण्याची पातळी वाढू लागली तेव्हा बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध थांबवावा लागला. एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, बुधवारी रात्री उशीरा दोघांचे मृतदेह वर्सोवा घाटाजवळील देवाची वाडी इथं सापडले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

अधिकाऱ्यानं पुढे सांगितलं की, अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी बोट चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल, कोणतीही खबरदारी न घेतल्यामुळे आणि बोटमधील प्रवाशांना लाइफ जॅकेट न दिल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी साडेसातच्या सुमारास एका बोटीतील सात जण मासेमारीसाठी मार्वे समुद्रकिनारी गेले होते. पण अचानक त्यांची बोट पलटली. यामध्ये सात जण बुडायला लागले. यापैकी चौघांना तिथल्या जीवनरक्षकांनी वाचवलं. पण तिन जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी दोन लोकांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक अद्याप बेपत्ता आहे.



हेही वाचा

मुंबईच्या मालाड मार्वेच्या समुद्रात बोट बुडाली, 4 जणांना वाचवण्यात यश 3 जणांचा शोध सुरू


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा