Advertisement

ताडदेवमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू


ताडदेवमध्ये भिंत कोसळून दोघांचा मृत्यू
SHARES

मुंबईतील ताडदेव आरटीओ कार्यालयाजवळील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून त्यात दोघेजण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यापैकी एक जण कंत्राटी कनिष्ठ अभियंता असल्याचं समजत आहे.


कधी घडला अपघात?

ताडदेव आरटीओ कार्यालयाजवळ सिद्धि अॅव्हेन्यू टाॅवर या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. इमारतीच्या बेसमेंट पीलर्सचं काम सुरू असताना सकाळी ११ वाजेच्या सुमारास या इमारतीची भिंत कोसळून त्याखाली तिघेजण आले.

कुणाचा समावेश?

या तिघांनाही त्वरीत मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. फैज खान (२४), तपनदास (२८) आणि जयदेव रॉय (२२) अशी या तिघांची नावे आहेत. यापैकी फैज खान आणि तपनदास यांचा मृत्यू झाला, तर राॅय याला उपचार करून रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं.

बेसमेंट पीलर्स टाकण्याचं काम असताना जमीन खचून भिंत कोसळल्याची माहिती मिळत आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा