Advertisement

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनवली मार्गदर्शक पुस्तिका

रुग्णांचा आकडा वाढू लागल्याचं समोर आलं. म्हणूनच या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनी बनवली मार्गदर्शक पुस्तिका
SHARES

सार्वजनिक ठिकाणी COVID 19 चा प्रसार होऊ नये म्हणून दोन विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे.

केंद्र आणि राज्य सरकारनं त्यांच्या अनलॉक प्रक्रियेअंतर्गत व्यवसायांना सुरू करण्याची परवानगी दिली. पण त्यानंतर रुग्णांचा आकडा वाढू लागल्याचं समोर आलं. म्हणूनच या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे.

कोरोनाव्हायरसचा धोका अद्याप कायम असल्यानं नागिरक अद्याप सार्वजनिक ठिकाणी बाहेर जात नाहीत. म्हणूनच निसारग शहा आणि स्मृती प्रसाद या दोन विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी चांगल्या पायाभूत सुविधांकरिता मार्गदर्शक पुस्तिका तयार केली आहे.

मार्गदर्शक पुस्तिका सार्वजनिक वाहतूक, उद्याने, मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, रस्ते, शाळा आणि कार्यालये यासह शहरी भागातील काही समस्यांवर कशाप्रकारे काम करता येऊ शकते हे सुचवते.

हिंदुस्तान टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मार्गदर्शिका डोईश गेसेल्सशाफ्ट फॉर इंटरनेशनल झुसमेनारबीट (GIZ) जीएमबीएच आणि सीईपीटी विद्यापीठाच्या अंतर्गत तयार केली गेली आहे. या प्रकल्पासाठी बीएमझेड (जर्मनीचे आर्थिक सहकार आणि विकास मंत्रालय) अंतर्गत स्मार्ट सिटीजच्या शहरी विकासासाठी अर्थसहाय्य दिले गेले आहे.

मार्गदर्शक पुस्तक देखील अशा लोकांसाठी डिझाइन केलं गेलं आहे जे वाचू शकत नाहीत. चित्रांच्या सहाय्यानं त्यात उदाहरणं देण्यात आली आहेत. निसारग शहा म्हणाले की, तो सीईपीटी विद्यापीठातून अर्बन डिझाईनमध्ये पदवी घेत आहेत. लोकांना सामाजिक अंतर पाळण्याची आठवण करून देण्यासाठी पुस्तकातील दाखले सार्वजनिक ठिकाणी पेस्ट केली जाऊ शकतात.

शासनाने सार्वजनिक आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी शहरभरात आरोग्य चौक्या तयार कराव्यात, असं या मार्गदर्शक पुस्तकात सूचवलं आहे. यात असंही म्हटलं आहे की, सोशल डिस्टनसिंगची आठवण करून देण्यासाठी आणि कोरोनाव्हायरसला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यक्त आहे. जनजागृतीसाठी स्ट्रिट आर्टचा आसरा देखील घेता येऊ शकतो.



हेही वाचा

११वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, सोमवारपासून ऑनलाइन वर्गाला सुरुवात

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! मिळणार ‘इतक्या’ रुपयांचा बोनस

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा