Advertisement

२ वर्षांचा मुलगा पडला मॅनहोलमध्ये, ९ तास उलटले तरी शोध सुरूच

मुंबईतल्या मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये २ वर्षांचा मुलगा पडल्याची घटना घडली आहे. दिव्यांशू असं या चिमुरड्याचं नाव आहे.

२ वर्षांचा मुलगा पडला मॅनहोलमध्ये, ९ तास उलटले तरी शोध सुरूच
SHARES

मुंबईतल्या मालाड येथील इटालियन कंपनी शेजारील नाल्याच्या मॅनहोलध्ये २ वर्षांचा मुलगा पडल्याची घटना घडली आहे. दिव्यांशू असं या चिमुरड्याचं नाव आहे. बुधवारी रात्री १०.२४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून, ९ तास उलटून गेले तरी अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर हा मुलगा वाहून गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि पालिका कर्मचारी या मुलाचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज

मालाडच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकात दिव्यांशू खेळत होता. त्यावेळी या चौकातील रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यात पाय घसरून तो पडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या व्हिडीओमध्ये नाल्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेल्याचं दिसत आहे.

घबराटीचं वातावरण

दिव्याशू जेव्हा नाल्यात पडला, त्यावेळी या परिसरात कोणीच नव्हतं. मात्र, काही वेळानं त्याची आई त्याला शोधण्यासाठी आली असता, मुलाचा शोध लागत नसल्यानं तिनं आरडाओरड करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तेथील स्थानिकांनी तातडीनं पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवांना याबाबत माहिती दिली. दरम्यान, पोलीस त्या चिमुरड्याचा शोध घेत आहेत. मात्र ९ तास उलटले तरी अजून त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळं त्यांच्या कुटुंबामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे



हेही वाचा -

बेस्टच्या प्रवासी संख्येत वाढ, मात्र उत्पन्नात घट



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा