Advertisement

Ulhasnagar : इमारतीचा स्लॅब कोसळला, ६ जणांचा मृत्यू

उल्हासनगरमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Ulhasnagar : इमारतीचा स्लॅब कोसळला, ६ जणांचा मृत्यू
SHARES

उल्हासनगर (Ulhasnagar)मध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब (Building slab fall down) कोसळून दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. कॅम्प नंबर २ च्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून तळ माजळ्याला आला.

इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू (6 people died) झाला आहे. तर इतर काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

न्यूज एजन्सी एएनआयनं केलेल्या ट्विटनुसार, या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली आणखी ३ नागरिक अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांसोबतच स्थानिक नागरिकही मदत कार्यात सहभागी झाले आहेत.

इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून थेट तळमजल्यावर आल्यान इमारतीत अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उल्हासनगर शहरात पंधरा दिवसात इमारतीचा स्लॅब कोसळून दुसरी मोठी दुर्घटना घडलीय.



हेही वाचा

रिलायन्स करणार कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांचं मोफत लसीकरण

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा