या दुचाकींचा वाली कोण?

 MAHIM
या दुचाकींचा वाली कोण?

माहीम - येथील पोलीस चौकीसमोर गुन्ह्यात सापडलेल्या दुचाकी अनेक वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे या विभागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे पादचाऱ्यांना ये-जा करण्यास त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पालिकेच्या सफाई कामगारांनाही या ठिकाणचा कचरा साफ करताना अडथळा निर्माण होतो. 

या विभागातील समाजसेवक इरफान मच्छिवाला तसेच त्यांचे सहकारी अनवर खान यांनी संबंधित विभागाकडे मेलद्वारे तक्रार दाखल केली आहे. मात्र या तक्रारीचे निवारण तातडीने करणार नसल्याचे माहीम पोलीस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

चेंबूरच्या माहूल गाव येथील या वाहनांसाठी असणारी जागा पूर्णपणे भरली आहे. त्या ठिकाणच्या ट्रॅफिक विभागाला दोन-तीन महिने वेळ देण्यात आला आहे. पर्यायी व्यवस्था होताच या दुचाकींना तिकडे हलवण्यात येईल, असेही या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जी उत्तर विभागाकडे देखील या दुचाकींसाठी जागा उपलब्ध नाही, असे जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त रमाकांत बिरादार यांनी स्पष्ट केले.

Loading Comments