फेरीवाल्यांना सत्ताधाऱ्यांचं पाठबळ - अमोल देसाई

लोअर परळ - पालिकेच्या कारवाईनंतरही लोअर परळच्या बाबाजी जामसांडेकर मार्गावर अनधिकृत स्टॉल धारकांचे अतिक्रमण सुरूच आहे. इथल्या अनधिकृत बांधकामं आणि स्टॉलवर पालिकेनं 23 डिसेंबरला कारवाई केली होती. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी फेरिवाल्यांचा बाजार पुन्हा भरला. यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि कामगारवर्ग यांच्या मार्गात पुन्हा अडथळा निर्माण झाल्यानं नाराजी व्यक्त केली आहे.

नागरिकांच्या तक्रारीनंतर उशिरा का होईना पालिकेच्या जी दक्षिण अतिक्रमण विभागानं अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारला होता. पण ती दुकाने आणि स्टॉल पुन्हा कशी उभारली जातात?. असा सवाल मनसेच्या शाखा क्रमांक 194 चे उपाध्यक्ष अमोल देसाई यांनी उपस्थित केला. तसंच 'पालिकेची कारवाई ही फक्त दाखवण्यापुरतीच आहे, या अनधिकृत फेरीवाल्यांना सत्ताधरी पक्ष पाठबळ देत आहे' असा आरोपही देसाई यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना केला.

Loading Comments