कधी थांबणार ही अवैध पार्किंग?

वाहतूक कोंडी हे मुंबईकरांना लागलेलं ग्रहण. अनेकदा या वाहतूक कोंडीचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागलाय. घाटकोपर-मानखुर्द लिंकरोडवर तर सध्या अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट इतका झालाय की ज्याचा त्रास इथल्या रहिवाशांना तर होतोच पण इथं वाहतूक कोंडीचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय. विशेष म्हणजे काही पार्किंग माफिये अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली लाखो रुपये कमावतायेत.

याबाबत वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रीया देणं टाळलं. त्यामुळे अनधिकृत पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी थांबवणार तरी कधी असा प्रश्न नागरिक करतायेत.

Loading Comments