Advertisement

उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात अधिक बेरोजगारी, CMIE ची धक्कादायक आकडेवारी जाहीर

देशातील बेरोजगारी कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसत असलं तरी बेरोजगारीचे देशातील १० राज्यांमधील प्रमाण चिंताजनक असल्याचंही समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रात अधिक बेरोजगारी, CMIE ची धक्कादायक आकडेवारी जाहीर
SHARES

देशावर ओढावलेल्या कोरोना संकटामुळे नागरिकांना गेले काही महिने लॉकडाऊनचा सामना करावा लागला. या काळात अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यानं बेरोजगारीत भर पडली.

पण आता अनलॉकनंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. याचाच परिणाम बेरोजगारांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकनॉमीनं (CMIE)नं यासंदर्भात आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील बेरोजगारी कमी झाल्याचं दिलासादायक चित्र दिसत असलं तरी बेरोजगारीचे देशातील १० राज्यांमधील प्रमाण चिंताजनक असल्याचंही समोर आलं आहे. पर्यटन व्यवसायावर आधारित राज्यामध्ये बेरोजगारी वाढल्याचं चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बेरोजगारीचं प्रमाण हे या आकडेवारीमध्ये उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त असल्याचं दिसत आहे. पीटीआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

हरयाणामधील १९.१७ टक्के नागरिक बेरोजगार आहेत. त्यानंतर १५.३० टक्के राजस्थानमधील बेरोजगारीचे प्रमाण तर १२.५ टक्के एवढे प्रमाण दिल्लीत आहे. निवडणूक असणाऱ्या बिहारमध्ये ११.९ टक्के एवढी बेरोजगारांची संख्या आहे.

१२ टक्के हिमाचल प्रदेशमध्ये तर उत्तराखंडमध्ये सर्वाधिक म्हणजेच २२.३ टक्के लोक बेरोजगार आहेत. त्याचबरोबर त्रिपुरामध्ये १७.४ टक्के, गोव्यात १५.४ टक्के आणि जम्मू काश्मीरमध्ये १६.२ टक्के लोक बेरोजगार असल्याचं सीएमआयईच्या सप्टेंबरच्या अहावालामधून समोर आलं आहे.

बंगालमध्ये ९.३ टक्के तर पंजाबमधील ९.६ टक्के लोकांच्या हाती काहीच काम नसल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. ८.२ टक्के एवढे झारखंडमध्ये बेरोजगारीचे प्रमाण आहेत. महाराष्ट्रामध्ये ४.५ टक्के तर उत्तर प्रदेशमध्ये ४.२ टक्के जनता बेरोजगार आहेत. सर्वात कमी म्हणजेच २.१ टक्के ओडिसामधील लोक बेरोजगार आहेत.

कोरोनाच्या पूर्वी देशातील अनेक औद्योगिक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कामाची निर्मिती होत होती. पण अनलॉक झाल्यानंतर तेवढ्याच प्रमाणात कामं सुरू न झाल्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. याला इतर कारणंही जबाबदार आहेत.

पर्यटन व्यवसायाला कोरोना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला असल्यामुळेच उत्तराखंड, हिमाचल, जम्मू-काश्मीरमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पूर्वीप्रमाणे पर्यटन व्यवसाय पूर्ण जोमानं सुरू होईपर्यंत ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

यासोबतच देशातील वाहतूक, मनोरंजन, रिटेल आणि हॉटेल उद्योग सुरु झालेले नसल्यामुळेच अनलॉकमध्येही अनेक राज्यांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण अधिक असल्याचं दिसत आहे.



हेही वाचा

मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाकडून प्रशंसा, 'हे' आहे कारण

“पालघरमधील प्रदूषण महिन्याभरात कमी करा”

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा