Advertisement

परदेशी देणगीतील दुरावस्थेतील शाळाच अमेरिकन दूताला दाखवली

अमेरिकेचे वाणिज्य दूत एडगार्ड डी. कागन यांनी एका पत्राद्वारे नूतनीकरण केलेली एक अाणि दुरूस्ती करत असलेली एक अशा महापालिकेच्या दोन शाळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानुसार कागन यांनी सुशोभिकरणानंतर चर्चेचा विषय ठरलेली १९८३ मधील 'वरळी सी फेस मनपा शाळा' आणि 'सिटी ऑफ लॉस एंजलिस' च्या तत्कालीन महापौरांनी दिलेल्या देणगीतून सुशोभित झालेल्या माहिम परिसरातील मनपा शाळेला भेट दिली.

परदेशी देणगीतील दुरावस्थेतील शाळाच अमेरिकन दूताला दाखवली
SHARES

मुंबईतील महापालिका शालेय इमारतींत सुधारणा करून त्यांचे नुतनीकरण करण्यात यावं, यासाठी लॉस एंजलीसने सुमारे ३० वर्षांपूर्वी अडीच कोटी रुपयांचं अर्थसहाय्य केलं होतं. याची आठवण म्हणून माटुंगा पश्चिम येथील मनमाला टॅँक महापालिका शाळेचे नाव सिटी ऑफ लॉस एंजलीस असं करण्यात आलं. या शाळेची सद्या डागडुजी केली जात अाहे.

 सोमवारी नेमकी तीच शाळा अमेरिकेचे वाणिज्य दूत एडगार्ड कागन यांना दाखवण्यात आली. महापालिकेच्या चकाचक आणि आकर्षक असलेल्या इमारती दाखवताना दुरूस्तीसाठी हाती घेण्यात आलेली शालेय इमारत म्हणून सिटी ऑफ लॉस एंजलीस ही शाळा दाखवून महापालिका शिक्षण विभागानं अब्रूचे धिंडवडेच काढले अाहेत.

२ शाळांना भेटीची इच्छा

अमेरिकेचे वाणिज्य दूत  एडगार्ड डी. कागन यांनी एका पत्राद्वारे नूतनीकरण केलेली एक अाणि दुरूस्ती करत असलेली एक अशा महापालिकेच्या दोन शाळांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे नुकतंच या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. यानुसार कागन यांनी सुशोभिकरणानंतर चर्चेचा विषय ठरलेली १९८३ मधील 'वरळी सी फेस मनपा शाळा' आणि 'सिटी ऑफ लॉस एंजलिस' च्या तत्कालीन महापौरांनी दिलेल्या देणगीतून सुशोभित झालेल्या माहिम परिसरातील मनपा शाळेला भेट दिली.


१२० शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद 

तत्पुर्वी दस्तुरवाडी परिसरात महापालिकेच्या व्हर्च्युअल एज्युकेशन प्रणालीच्या स्टुडिओला कागन यांनी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते अादित्य ठाकरे यांच्यासह भेट देऊन तेथील अत्याधुनिक प्रणालीची माहिती घेतली. तसंच महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या टॅबचा होत असलेला वापर पाहून त्यांनी महापालिकेच्या शिक्षण खात्याचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर महापालिकेच्या व्हर्च्युअल एज्युकेशन स्टुडिओच्या माध्यमातून कागन यांनी महापालिकेच्या १२० शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकांचे निरसनही केलं.


विद्यार्थ्यांचं इंग्रजीतून संभाषण

यानंतर कागन यांनी वरळी व माहिम येथील मनपा शाळांना भेट दिली. यावेळी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांशी त्यांनी इंग्रजीतून संवाद साधला. तर पालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांनी देखील त्यांच्याशी इंग्रजीतूनच संभाषण केले. या भेटी प्रसंगी युवासेना प्रमुख व शिवसेना नेते  आदित्य ठाकरे, शिक्षण समितीचे अध्यक्ष  मंगेश सातमकर, शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे, महापालिकेच्या शिक्षण खात्याचे उपायुक्त  मिलिन सावंत, शिक्षणाधिकारी  महेश पालकर, उपशिक्षणाधिकारी  राजू तडवी या मान्यवरांसह संबंधित शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.



आठ भाषिक माध्यमांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासह 'व्हर्च्युअल एज्युकेशन' सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये केला जात आहे. टॅबद्वारे शिक्षण देण्याची व्यवस्था असणाऱ्या मनपा शाळांच्या इमारतीदेखील आकर्षक आहेत.  एवढंच नाही तर या शाळांमधील विद्यार्थी चांगले वाद्य वादन करतात आणि माझ्याशी इंग्रजी भाषेत चांगल्या प्रकारे संवादही साधतात, हे पाहून मी भारावून गेलो आहे.
- एडगार्ड कागन, वाणिज्य दूत, अमेरिका



हेही वाचा -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर टोलबंदी नाहीच, २०३० पर्यंत वसूल करणार टोल

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना बढतीत २५ टक्के आरक्षण



 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा