Advertisement

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे आता शाळांमध्येही लसीकरण

लसीकरण हा कोरोनावरील जालीम उपाय असून, सर्वत्र लसीकरण केलं जात आहे.

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे आता शाळांमध्येही लसीकरण
SHARES

सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर आता शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण मोहिम राबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. लसीकरण हा कोरोनावरील जालीम उपाय असून, सर्वत्र लसीकरण केलं जात आहे.

राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. तसंच मुलांच्या लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचं कारण नाही असेही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीबद्दलचं सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर जोर दिला गेला पाहिजे, यावर बैठकीत भर देण्यात आला आहे.

'२४ जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्हा एकदा सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या सल्ल्याने कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या शाळा सुरू करायच्या हा निर्णय त्यांनी द्यावा. मात्र, बऱ्यापैकी शाळा सुरू कराव्यात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे', अशी माहिती टोपे यांनी दिली.

'१५ ते १८ वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचं शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी, अशी चर्चाही बैठकीत झाली' असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

लसीकरणाबद्दल पालकांमध्ये संभ्रम असण्याचं कोणतंही कारण नाही. जगामध्ये सगळीकडे लहान मुलांचंही लसीकरण सुरू झालेलं आहे. आपल्याकडे सध्या १५ ते १८ वयोगटातील मुलाचंच लसीकरण केलं जात आहे. त्यामुळे लसीकरणाबद्दल संभ्रम बाळगण्याचं कारण नाही,” असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पालकांना केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा