Advertisement

भाज्यांच्या दरात घट

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे.

भाज्यांच्या दरात घट
SHARES

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर गडगडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता ताज्या भाज्या स्वस्त दरात मिळणार आहेत. सध्या भाज्याची निर्यात होत नसल्याने भाज्यांच्या दरात घट झाली आहे. त्याउलट हिवाळ्यात भाज्यांची आवक वाढते. सध्या मार्केटमध्ये ६०० भाजीपाल्यांच्या गाड्या येत आहेत. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात माल पडून आहे.

भाजीवाले अगदी कमी दरात हा भाजीपाला विकत आहेत. परिणामी घाऊक भाजीपाला बाजारातील दर कमी झाले आहेत.

भाजीपाल्यांचे घसरले दर

किलोप्रमाणे भाज्यांचे दर

कोबी – ६ रुपये किलो

फ्लॉवर – ८ रुपये किलो

भोपळा – १० रुपये किलो

काकडी- ८ रुपये किलो

पडवळ – १२ रुपये किलो

सुरण – १० रुपये किलो

टोमॅटो- १५ रुपये किलो

वांगी – १५ रुपये किलो

कारले – २२ रुपये किलो

घेवडा- २५ रुपये किलो

भेंडी- २० रुपये किलो

फरसबी – २० रुपये किलो

मटार – १८ ते २२ रुपये किलो

बाजारात मटारच्या दररोज ५० ते ६० गाड्या येत आहेत. त्यामुळे मटारही स्वस्त झाले आहे. सध्या मटार १८ ते २२ रुपये किलोच्या भावाने विकला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसतरी ग्राहकांना कमी दरात भाजीपाला मिळणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा