Advertisement

पत्रकार विनोद दुआ आयसीयूत दाखल

विनोद दुआंची मुलगी आणि कॉमेडियन मलायका दुआनं यासंदर्भातील माहिती दिली आहे.

पत्रकार विनोद दुआ आयसीयूत दाखल
SHARES

प्रसिद्ध पत्रकार विनोद दुआ यांची प्रकृती गंभीर असून ते आयसीयूमध्ये दाखल आहेत. विनोद दुआंची मुलगी आणि कॉमेडियन मलायका दुआनं सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. मलायकानं तिच्या वडिलांच्या प्रकृतीची माहिती इंस्टाग्रामवर दिली आहे.

तिनं लिहिलं आहेकी, 'माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर आहे आणि ते आयसीयूमध्ये आहेत. एप्रिल महिन्यापासून त्यांची प्रकृती सतत खालावत चालली आहे. त्यांनी एक विलक्षण जीवन जगले आहे आणि आम्हाला तेच दिले आहे. त्यांना वेदना होऊ नयेत. प्रत्येकजण त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करते की कृपया उफवा पसरवू नका.

विनोद दुआ आणि त्यांची पत्नी चिन्ना दुआ यांना कोरोनाव्हायरसच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. चिन्ना दुआला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला होता. व्यवसायानं रेडिओलॉजिस्ट असलेल्या चिन्ना दुआचं खरं नाव पद्मावती दुआ होतं.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. विनोद दुआ यांनी ७ जून रोजी फेसबुक पोस्टद्वारे पत्नीच्या निधनाची दुःखद बातमी दिली होती. चिन्ना दुआ यांनी २०१९ पर्यंत जवळजवळ २४ वर्षे रेडिओलॉजिस्ट म्हणून काम केलं.

विनोद दुआ हे यूट्यूब चॅनलवर पोस्ट केल्या जाणाऱ्या व्हिडिओंबाबतही वादात सापडले आहेत. व्हिडीओद्वारे लोकांना भडकावल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. याप्रकरणी विनोद दुआ यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, जूनमध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द केला.

६७ वर्षीय विनोद दुआ हे मीडियातील एक प्रसिद्ध नाव आहे. विनोद दुआ यांनी दूरदर्शनसाठीही काम कें आहे. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत विनोद दुआ आणि त्यांच्या पत्नीला गुरुग्राममधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तेव्हापासून विनोद दुआ यांच्या प्रकृती सातत्यानं धासाळत आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा