Advertisement

कौमार्य चाचणीची वाच्यता करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार


कौमार्य चाचणीची वाच्यता करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
SHARES

जातपंचायत नियमांनुसार कौमार्य चाचणी करण्याबाबत जाहीर वाच्यता केल्यास यापुढे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी अाज विधानपरिषदेत केली. शिवसेनेच्या नेत्या आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांनी बुधवारी कौमार्य चाचणी आणि महिलांवरील अत्याचारांना दिल्या जाणाऱ्या समर्थनाच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच असे नियम करणाऱ्या जातपंचायतींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना त्यांनी सभागृहात मांडली होती. या सूचनेला उत्तर देताना रणजित पाटील यांनी ही घोषणा केली.


पोलीस नोंदवणार ‘सु मोटो’ गुन्हा

सामाजिक बहिष्कार कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटनांबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांची दखल घेऊन पोलिसांकडून स्वत: ‘सु मोटो’ गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी लढा देणाऱ्या सुशिक्षित लोकांबरोबर बैठकही घेण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


अाजही होतात कौमार्य चाचण्या

कंजारभाट समाजात आजही जातपंचायतीच्या नियमांनुसार कौमार्य चाचण्या सुरू असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी सदर लक्षवेधी सूचना मांडनाता सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. तसंच देशाच्या संविधानाचा सर्वत्र आदर होत असताना, कंजारभाट समाजातर्फे आपलं वेगळं संविधान निर्माण करून राज्यघटनेचा अनादर करत असल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले. या समाजातील मुलींना न्याय आणि संरक्षण देण्यासाठी तसंच असे निर्णय घेणाऱ्या जातपंचायतींवर कारवाई करण्यासाठी सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज अाहे, अशी मागणीही त्यांनी केली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा