•  पादचारी पूल कधी तयार होणार?
  •  पादचारी पूल कधी तयार होणार?
SHARE

नाहूर - प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नाहूर स्थानकात ठाण्याच्या दिशेने रेल्वेनं नवा पादचारी पूल  बांधायला घेतला आहे. पण त्याचं काम फारच संथ गतीने चाललं आहे. सहा ते सात महिन्यांपूर्वी हे बांधकाम सुरू करण्यात आलं होतं. तीन महिने पावसाळा सुरू असल्याने हे काम रखडलं होतं, असं रेल्वेचे अधिकारी सांगतात. या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सध्या असलेला या स्थानकातला एकच पूल गैरसोयीचा ठरतो आहे. हा नवा पूल सुरू झाला की अनेकांची गैरसोय दूर होणार आहे. पण त्याचं काम रखडल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या