ठाण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीतर्फे बारवी गुरुत्व जलवाहिनीची देखभाल आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय. त्यासाठी गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्यामुळे ठाणे, कळवा, दिवा या भागातील नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलंय. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याचं पाणीपुरवठा विभागानं सांगितलंय.