Advertisement

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांत मिळून सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता
SHARES

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांत मिळून सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा असल्याची माहिती समोर येत आहे. पावसानं पाठ फिरवल्यामुळे गेल्या २-३ दिवसांपासून पाणीसाठा खालावू लागला आहे. अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो.

या सातही धरणांत मिळून बुधवार, ७ जुलैपर्यंत के वळ दोन लाख ६६ हजार ८४८ दशलक्ष लिटर पाणीसाठा म्हणजे धरणाच्या साठवण क्षमतेच्या केवळ १८.४४ टक्के  पाणीसाठा आहे. जून महिन्यात वेळेवर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे पाणीसाठा वाढू लागला होता. जूनअखेरीस तुरळक पाऊस आणि मातीतून झिरपत आलेल्या पाण्यामुळे तलावातील पाणीसाठा काही प्रमाणात वाढत होता.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून पाणीसाठा खालावू लागला आहे. त्यामुळं गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पाणीकपात होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पुढील आठवड्यापर्यंत पाणीकपातीबाबत विचार-विनिमय के ला जाण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा