Advertisement

मालाड, कांदिवलीतल्या 'या' भागांमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद

सोमवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० पासून मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मालाड, कांदिवलीतल्या 'या' भागांमध्ये मंगळवारी पाणीपुरवठा बंद
SHARES

मालाड आणि कांदिवली पश्चिम भागात येत्या मंगळवारी चोवीस तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० पासून मंगळवार, १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मालाड (पश्चिम) विभागातील मालवणी प्रवेशद्वार क्रमांक १, राधाकृष्ण हॉटेल समोर मार्वे मार्ग येथे नव्याने घातलेल्या ७५० मिलीमीटर व अस्तित्वात असलेल्या ६०० मिलीमीटर व्यासांच्या जलवाहिन्यांच्या जोडणीचे व ६०० मिलीमीटर मध्यवर्ती झडप बसविण्याचे काम सोमवारी रात्री १० वाजेपासून हाती घेण्यात येणार आहे.

त्यामुळे या कालावधीत म्हणजे सोमवारी रात्री १० वाजेपासून मंगळवारी रात्री १० वाजेपर्यंत मालाड (पश्चिम) विभागातील मढ, मालवणी, जनकल्याण नगर, मनोरी, गोराई तसेच कांदिवली (पश्चिम) या विभागातील छत्रपती शिवाजी महाराज संकुल आणि न्यू म्हाडा परिसरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

पाणीकपातीपूर्वी अगोदरच्या दिवशी पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. तसेच, कपातीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, अशी विनंती मुंबई महानगरपालिका प्रशासनान केली आहे.



हेही वाचा

मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, 2 दिवासासाठी यलो अलर्ट

मुंबई विमानतळावरील धावपट्ट्या उद्या सहा तासांसाठी बंद

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा