Advertisement

ठाण्यात जिल्ह्यात महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा बंद

ठाणे जिल्ह्यातील आंध्र आणि बारावी या दोन धरणातील पाण्याच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला. दोन्ही धरणांमध्ये एकूण ३५७.२८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठाण्यात जिल्ह्यात महिन्यातून दोनदा पाणीपुरवठा बंद
SHARES

ठाणे जिल्ह्यात पुढील काही महिने पाणीकपातीचं संकट असणार आहे. जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्याचं १५ जुलैपर्यंतचं नियोजन करण्यात आलं आहे. यासाठी लघु पाटबंधारे विभागाने १४ टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील शहरांचा पाणी पुरवठा आता महिन्यातून दोन वेळा २४ तास बंद राहणार आहे. 

ठाणे जिल्ह्यातील आंध्र आणि बारावी या दोन धरणातील पाण्याच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला. दोन्ही धरणांमध्ये एकूण ३५७.२८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ जुलैपर्यंत पुरवण्यासाठी महिन्यातून दोन दिवस २४ तास पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना पाणीपुरवठा बंद ठेवण्यासाठी वार ठरवून देण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली शहराला होणारा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असेल. अंबरनाथ आणि बदलापूरमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून प्रत्येक महिन्याच्या दुसरा आणि चौथा आठवड्यातील सोमवारी पाणी कपात असेल. 

ठाणे, नवी मुंबई, मिरा—भाईंदर, कल्याण—डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, तळोजा आणि बदलापूरच्या काही भागात एमआयडीसीकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. तर, ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर भागात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात एमआयडीसीचा तर, ठाणे शहरात स्टेमचा पाणी पुरवठा होतो. या सर्वच भागांना गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा