Advertisement

ठाण्यात 30 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा खंडित

नागरिकांना जपून पाणी वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

ठाण्यात 30 सप्टेंबरपर्यंत पाणीपुरवठा खंडित
SHARES

ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. तरीही ठाणेकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

येत्या मंगळवारपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात आणि अनियमित पाणीपुरवठा होणार आहे. या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 27 लाख इतकी आहे. शहरासाठी प्रतिदिन 621 दशलक्षलीटर इतक्या पाण्याची गरज आहे. परंतु शहराला प्रत्यक्षात दररोज 590 दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा होतो.

भातसा धरण क्षेत्रात मुसळधार पावसामुळे, ठाणे महानगरपालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशनजवळील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या साचल्या आहेत. 

त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 90 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो.

परंतु वाढत्या लोकवस्तीमुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. त्यात तांत्रिक कारणामुळे टंचाई समस्येत वाढ होत आहे.

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करते. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्वाचा स्रोत मानला जातो. या पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका भातसा नदीच्या पात्रावरील पिसे बंधाऱ्यातुन पाणी उचलते आणि त्याचा शहरात पुरवठा करते. परंतु या पाणी पुरवठ्यात कपात झाली आहे.



Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा