Advertisement

'या' भागातील पाणीपुरवठा शुक्रवारपर्यंत प्रभावित राहील


'या' भागातील पाणीपुरवठा शुक्रवारपर्यंत प्रभावित राहील
(Representational Image)
SHARES

ठाणे महानगरपालिकेने (TMC) दिलेल्या माहितीनुसार, शहरातील त्यांच्या कार्यक्षेत्रात 20 आणि 21 जुलै रोजी पाणीपुरवठा होणार नाही. दरम्यान, ठाण्यात 22 जुलै रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

मुख्य वितरण वाहिनीसह कोपरी येथील कन्हैयानगर जलसाठा येथे नव्याने बसविलेल्या डाउन-टेक पाईपच्या जोडणीचे काम सुरू आहे. 

त्यामुळे नौपाडा-कोपरी परिसरातील रहिवाशांना बुधवार (आज), गुरुवार, 21 जुलै आणि शुक्रवार, 22 जुलै असे तीन दिवस पाणी साठवून ठेवावे लागणार आहे. पाईप जोडणीचे काम अत्यंत निकडीचे असल्याचे टीएमसी पाणी विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

बाधित भागात कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साईनगर, नातू कॉलनी, सावरकर नगर, वाल्मिकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णनगर आणि स्वामी समर्थ मठ परिसराचा समावेश आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा