Advertisement

नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! 5 आणि 6 जानेवारीला पाणीपुरवठा बंद

हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा लाईनची देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे.

नवी मुंबईकरांनो लक्ष द्या! 5 आणि 6 जानेवारीला पाणीपुरवठा बंद
SHARES

नवी मुंबईत 5 जानेवारी 2024 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे पाणीपुरवठा लाईनवरील गावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.  

हेटवणे पाणीपुरवठा लाईनवरील गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोड्सचा पाणीपुरवठा शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 ते शनिवार, 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत म्हणजेच 24 तास बंद राहणार आहे. 

हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा लाईनची देखभाल व दुरुस्तीचे काम सुरू आहे. तसेच त्यानंतर पुढील 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. सिडकोने बाधित भागातील रहिवाशांना या कालावधीत पुरेसा पाणीसाठा करून त्याचा विवेकपूर्वक वापर करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा

मुंबईकरांच्या खिशाला फटका, विजेचे दर वाढणार

प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचा रस्ता कधी सुरू होणार?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा