Advertisement

मुंबईकरांनो लक्ष द्या! वांद्रे-धारावीसह 'या' भागात पाणीपुरवठा बंद

पाइपलाइनच्या दुरुस्तीचे आणि जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! वांद्रे-धारावीसह 'या' भागात पाणीपुरवठा बंद
SHARES

गुरुवार आणि शुक्रवारी वांद्रे पूर्वसह धारावीच्या बहुतांश भागात पाणीपुरवठा (मुंबई पाणीकपात) होणार नाही. तर काही भागांत 25 टक्के पाणीकपात होणार आहे. अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंड येथे असलेल्या 2400 मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे आणि जोडणीचे काम गुरुवार-शुक्रवारी होणार असल्याचे बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आले.

याचाच परिणाम म्हणजे, मुंबईतील वांद्रे पूर्व भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तर धारावीच्या काही भागात 25 टक्के पाणीकपात होणार आहे. गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत (सुमारे 18 तास) पाइपलाइन जोडण्याचे काम केले जाणार आहे.

कुठल्या भागात 100 टक्के पाणीकपात?

शुक्रवार, 18 एप्रिल 2024 आणि शुक्रवार, 19 एप्रिल रोजी वांद्रे पूर्वेकडील वांद्रे रेल्वे टर्मिनस आणि वांद्रे स्टेशन परिसरात पाणी नसेल. धारावीमध्ये 18 एप्रिल रोजी जी नॉर्थ वॉर्डांतर्गत धारावी लूप रोड, नाईक नगर, प्रेम नगर या भागात सकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच 18 एप्रिल रोजी धारावीतील गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक मार्ग परिसरात संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.

25 टक्के पाणीकपात

धारावीच्या 60 फूट रोड, सायन-माहिम लिंक रोड, 90 फूट रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कय्या मार्ग, AKG नगर आणि एमपी नगरमध्ये गुरुवार, 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी 25% पाणीकपात होणार आहे.



हेही वाचा

डाळींचे भाव कडाडले! 'हे' आहेत नवे दर

सावध रहा! मुंबईच्या तापमानात आणखी वाढ होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा