Advertisement

पश्चिम रेल्वे 30 मिनिटे उशिराने

मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेलाही बसला आहे.

पश्चिम रेल्वे 30 मिनिटे उशिराने
SHARES

मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.

दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या (western railway) लोकल सेवेलाही बसला आहे.

वसई, नालासोपारा आणि विरारदरम्यान (virar) रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत.

तसेच वसई रोड-विरारदरम्यानची उपनगरी सेवा सध्या मर्यादित स्वरूपात सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, वसई, नालासोपारा आणि विरारदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या मार्गावरील लोकल गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून वसई आणि नालासोपारा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोकल वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला होता.

काही लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही वसई रेल्वे स्थानकावर अनेक तास हजारो प्रवासी अडकून पडले.

परिस्थिती इतकी गंभीर झाली की, अनेक प्रवाशांनी जीव धोक्यात घालून रेल्वे रुळांवरून पायी चालत वसईहून नालासोपारा आणि विरारपर्यंतचा प्रवास केला.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबई आणि उपनगरांमध्ये दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी (heavy rain) कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह ताशी 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे पश्चिम रेल्वेने विशेषतः वसई रोड-विरार मार्गावरील प्रवाशांना विलंबाचा अंदाज घेऊनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा