जनजागृती हाच उपाय...

Mumbai  -  

जागतिक आरोग्य संघटनेने 28 मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन' म्हणून जाहीर केला आहे. 21 व्या शतकातही महिला या गोष्टीबाबत तितक्याशा जागरूक दिसत नाहीत. आज या विषयावर अनेक घरात मासिक पाळीवर मनमोकळेपणाने बोलले जात नाही. या दिवसाबाबत केवळ स्त्रीच नाही तर पुरुषही जागरूक असणे आवश्यक आहे. आजही गावखेड्यात मासिक पाळी ही अशुभ मानली जाते. मासिक पाळ दरम्यान मंदिरात न जाणं असे अनेक प्रकार आजही सुरू आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण आणि काही ठिकाणी शहरी भागात आजही अनेक मुली सॅनिटरी नॅपकिन ऐवजी कपडा वापरतात. हे मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. मसिक पाळीबाबात सामान्य मुंबईकरांचं काय म्हणणं आहे, हे 'मुंबई बोले तो' मध्ये आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Loading Comments