• आझाद उद्यानातल्या शौचालयाचं लोकार्पण
  • आझाद उद्यानातल्या शौचालयाचं लोकार्पण
  • आझाद उद्यानातल्या शौचालयाचं लोकार्पण
  • आझाद उद्यानातल्या शौचालयाचं लोकार्पण
SHARE

ओशिवरा - महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओशिवऱ्यात अपक्ष नगरसेवक चंगेज मुलतानी यांच्या प्रयत्नांतून मौलाना अब्दुल कलाम आझाद उद्यानातील शौचालयाचं नुकतच उद्घाटन झालं. माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत आणि के/पश्चिमचे वॉर्ड अधिकारी पराग महसूरकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. हे उद्यान गेल्या वर्षीच खुलं झालं होतं. सकाळी मॉर्निग वॉकसाठी येणाऱ्यांची जवळपास शौचालय नसल्यानं गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक चंगेज मुलतानी यांच्या प्रयत्नांतून सर्वलोक विकास सेवा मंडळामार्फत हे शौचालय उभारण्यात आलं. महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे राहिलेले फंड वापरून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, अशी चर्चा यानिमित्तानं सुरू झालीये.

संबंधित विषय
ताज्या बातम्या