कचऱ्यामुळे स्थानिक त्रस्त

 Masjid
कचऱ्यामुळे स्थानिक त्रस्त

मस्जिद - शरीफ देवजी स्ट्रीटवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हीच परिस्थिती आहे. या स्ट्रीटवर भाजी विक्रेते बसतात. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. स्थानिकांनी कचऱ्याच्या डब्याची मागणी अनेकदा केलीय. नगरसेवक जावेद जुनेजा यांनी पालिकेत याची तक्रारही केलीय. पण लेखी तक्रार दिली तरच याची दखल घेतली जाईल, असं पालिकेकडून सांगितलं जातंय.

"कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसंच मच्छरांचा प्रादुर्भावही वाढलाय. त्यासाठी कचऱ्याचे डबे द्यावेत," अशी मागणी दुकानदार रवी गुप्ता यानं केली.

Loading Comments