Advertisement

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली


डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली
SHARES

मुंबईच्या डोंगरी परिसरात एका इमारतीचा काहीसा भाग कोसळल्याची घटना घडली आहे. बुधवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास रझाक चेंबर इमारतीचा भाग कोसळला आहे. दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात पडझडीच्या घटनांचं अद्याप सत्र सुरुच आहे.

डोंगरी येथील भारत पेट्रोल पंपासमोरील तळमजला अधिक चार मजली रझाक चेंबर इमारतीचा मागील संपूर्ण भाग कोसळला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ जणांना सुखरुप बाहेर काढले, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षानं दिली.

येथील बचावकार्यासाठी ४ फायर इंजिन, १ जेसीबी, १ रेस्क्यू व्हॅन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. या घटनेत जीवितहान झाली नसली तरी, या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचं मोठं नुकसान झालं आहे.

याआधी फोर्ट येथे भानुशाली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सर्वांना आपले घर तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.भानुशाली ही इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जणांचा मृत्यू झाला होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा