'बेस्ट' की वर्स्ट

 Malad
'बेस्ट' की वर्स्ट
'बेस्ट' की वर्स्ट
See all

मालाड – महापालिकेच बेस्ट विभाग म्हटलं की करोडो रुपयांचं बजेट समोर येतं, मात्र या बेस्ट व्यवस्थापनाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसुविधांकडेच दुर्लक्ष केले आहे. मालाड पश्चिमेकडील आनंद रोड येथील बस कर्मचाऱ्यांची आनंद रोड चौकी ही सिमेंटच्या पत्र्यांनी बांधलेल्या खोलीत भरते. चारही बाजूला सिमेंट पत्र्याच्या खोलीत कोणतीही सोयीसुविधा नाही. या चौकीत दररोज मालाड स्टेशन ते उष्मा नगर, जनकल्याण नगर, मालाड डेपो या मार्गावरून धावणाऱ्या बेस्टचे कर्मचारी काही मिनिटे आराम करतात. खोलीत दिवसा अंधार पसरलेला असतो. पिण्याच्या पाण्याची जागेत अस्वच्छता पसरली असून शौचालय देखील तुटलेल्या अवस्थेत आहे . ना बसायला धड जागा ना स्वच्छता अशा खोलीत बेस्टचे चालक आणि कंडक्टर विश्रांती करतात. गेले कित्येक वर्ष या चौकीची अशीच दुरवस्था असून नाईलाज म्हणून आम्ही येथे आश्रय घेत असल्याचे बेस्ट कर्मचाऱ्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या या समस्यांबाबत बेस्ट महाव्यवस्थापकांना पत्र लिहून याकडे लक्ष वेधणार असल्याचे बेस्ट समितीचे सदस्य आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस संदेश कोंडविलकर यांनी सांगितले.

Loading Comments