Advertisement

आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाची कारवाई

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत.

आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाची कारवाई
SHARES

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या ३ आठवड्यापासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्या पुर्ण होण्यासाठी आंदोलन करत आहेत. परिणामी प्रवाशांचे हाल होत आहेत. शिवाय, एसटीला ही काहीसा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळं आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळानं कारवाई सुरू केली आहे.

आता या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळं आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या ४ हजार ३४९ वर गेली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. हा संप फोडण्यासाठी एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई सुरू केली होती. न्यायालयाचे निर्देश असतानाही कामगार संपावर गेल्याने महामंडळाने कारवाई सुरू केली आहे.

आतापर्यंत महामंडळाकडून २०५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता महामंडळात रोजंदारीनं काम करणाऱ्या २५०० कर्मचाऱ्यांपैकी २२९६ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावली आहे. कारवाईच्या धास्तीनं कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.  

नोटीस

  • चालक : २५
  • चालक तथा वाहक : २१०१
  • वाहक : १३२
  • सहाय्यक : २२
  • लिपिक टंकलेखक : १६
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा