उत्तीर्ण उमेदवारांचा महापालिका कार्यालयाला घेराव

  • उत्तीर्ण उमेदवारांचा महापालिका कार्यालयाला घेराव
  • उत्तीर्ण उमेदवारांचा महापालिका कार्यालयाला घेराव
  • उत्तीर्ण उमेदवारांचा महापालिका कार्यालयाला घेराव
  • उत्तीर्ण उमेदवारांचा महापालिका कार्यालयाला घेराव
SHARE

सीएसटी - 2009 मधील परीक्षा उत्तीर्ण होऊनही अद्याप सेवेत भरती न केल्यामुळे बुधवारी या उत्तीर्ण उमेदवारांनी महापालिका मुख्यालयाच्या गेटसमोर घेराव आंदोलन केलं. मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या मुजोर भूमिकेत बदल झाला नाही, तर आत्मदहन करू, असा इशाराही या वेळी पालिका प्रशासन आणि नगरसेवकांना देण्यात आला. हे सर्व उमेदवार मुंबईसह राज्यातील कानोकापऱ्यातून आले आहेत. मराठी मुलांच्या कामगार भरतीचा प्रश्न कोणत्याच राजकीय पक्षांनी सोडवलेला नाही. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू, तसंच याबाबत सर्वत्र कुटुंबासह प्रचार करणार आहे, असं भरतीतील एक उत्तीर्ण उमेद्वार विनोद घाडीगावकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या